- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.अबुझमदच्या जंगलात सायंकाळ पर्यंत चकमक सुरू होती.मिळालेल्या माहितीनुसार,चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले आहे.एसपी आयच्या अलीसेला यांनी पुष्टी केली आहे.चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.याशिवाय घटनास्थळावरून अनेक शस्त्रे आणि स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.कांकेर डीआरजी,नारायणपूर डीआरजी,बीएसएफ आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने मोठी कारवाई केली आहे.
मागील काही दिवसांपुर्वी छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात चकमकीत ठार झालेल्या प्लॅटून कमांडरसह ८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांनी मृतदेह जप्त केले होते.या परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे; असे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.
- Advertisement -