- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या उत्तर बस्तर जिल्ह्यातील कांकेर मधील तिरियापाणी आणि छिंदखरकच्या घनदाट जंगलात आज,रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन पुरूष नक्षलवादी तर एक महिला नक्षलवादी ठार झाली असून घटनास्थळावरून १ एसएलआर,एक ३०३ रायफल व एक १२ बोअर रायफल हस्तगत करण्यात आली आहे. मारल्या गेलेल्या पुरुष नक्षलवाद्यांवर १३ लाख तर महिला नक्षालीवर १ लाख एकूण १४ लाखाचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले होते.ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये १.सर्वन मडकम उर्फ विश्वनाथ उर्फ बुधराम पुनेम,एसीएम,सीतानदी/रावस समन्वय क्षेत्र समिती सचिव,२.राजेश उर्फ राकेश हेमला,एसीएम,नागरी एरिया कमिटी/गोबरा एलओएस कमांडर,३.महिला नक्षलवादी बसंती कुंजम उर्फ हिडमे,समन्वयक,संरक्षण पथक,मैनपूर नुआपाडा सदस्य असे मृत नक्षलवाद्यांची नावे असून सर्वन मडकम याच्यावर ८ लाखांचे बक्षीस, राजेश उर्फ राकेश हेमला याच्यावर ५ लाखांचे बक्षीस तर बसंती कुंजम हीच्यावर १ लाखाचे बक्षीस जाहीर होते. कांकेर आणि गरियाबंद जिल्ह्यातील सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाईत सहभाग घेतला होता.आज रविवारी सकाळच्या सुमारास कांकेर आणि गरियाबंदच्या डीआरजीसह(डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड)बीएसएफ जवानांची संयुक्त टीम नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी रवाना झाली होती.टीम तिरयापाणीच्या जंगलात पोहोचताच जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.चकमक संपताच परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. शोधमोहीम तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह तसेच नक्षली साहित्य ताब्यात घेण्यात आले.
- Advertisement -

