Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दलास मोठे यश; चार नक्षलवाद्यांचा खात्मा..

सुरक्षा दलास मोठे यश; चार नक्षलवाद्यांचा खात्मा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागातील बासगुडा आणि गंगलुर पोलिस ठाण्याच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवादी असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे काल,शनिवार २६ जुलै रोजी सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली असता सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.सदरची चकमक आज,रविवार २७ जुलै रोजी दुपारपर्यंत सुरू होती.चकमकीनंतर, घटनास्थळाच्या शोध मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून चकमकीत दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.चार नक्षलवाद्यांवर शासनाच्या वतीने तब्बल १७ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.चकमकीच्या ठिकाणाहून एक एसएलआर,एक इन्सास,एक ३०३ रायफल,एक १२ बोर बंदूक,बीजीएल लाँचर,सिंगल शॉट शस्त्रासह मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.खात्मा करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये १.हुंगा,(ACM),प्लाटून क्रमांक-१०,दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो (रुपये ५ लाखाचे  बक्षीस), २.लक्खे,(ACM),प्लाटून क्रमांक-३०,दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो (रुपये ५ लाखाचे बक्षीस), ३.भीमे,(ACM),दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो(रुपये ५ लाखाचे बक्षीस), ४.निहाल उर्फ राहुल,पक्ष सदस्य,ब्युरो कम्युनिकेशन टीम प्रमुख,(रुपये २ लाखाचे बक्षीस) अशी नक्षलींची नावे आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!