सिरोंचा :- सिंचाई विभागाच्या कार्यालयात चोरट्यांनी डल्ला मारला असून कार्यालयाच्या मुख्य द्वाराच्या लोखंडी गेटसह, दरवाजे, खिडक्या,इलेक्ट्रॉनिक वस्तू,फॅन,लोखंडी आलमारी आदी साहित्य चोरट्यानी लंपास केले व कार्यालयीन दस्ताऐवजांचीही ऐशीतैशी केली आहे.
चोरट्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांची घरे फोडून दागिने,किंमती वस्तू रोख रक्कम यासह शेतकऱ्यांची जनावरे,शेती अवजारे आदी वस्तूंची चोरी केल्याच्या घटना आपण ऐकल्या होत्या.मात्र चोरट्यांनी कमाल करीत चक्क सरकारी कार्यालयच फोडल्याचा प्रकार सिरोंचा सिंचाई शाखा अभियंता कार्यालयात उघडकीस आला असल्याने चोरट्यांद्वारे शासकीय कार्यालयातील चोरी सिरोंचा नगरवासीयांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.