Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजसाहेब..! तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या....मात्र बंद पडलेले कृषी मीटर सुरू करा....- जुनी...

साहेब..! तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या….मात्र बंद पडलेले कृषी मीटर सुरू करा….- जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस दिली हाक….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली(देसाईगंज) :- तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापूरामुळे देसाईगंज तालुक्यातील सर्व जन-जीवन विस्कळीत झाले होते.काहींची घरे उद्ध्वस्त झाली तर काहींची गायी,ढोरे,शेळ्या,बकरे वाहून गेलीत.त्याच बरोबर शेतकरी बांधवांची उभी असलेली पिके, शेतातील मोटार पंप व पाईप वाहून गेली.अशातच शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाच्या वीज तारा तुटून पडल्या व कृषी मीटर,डीपी पुराच्या पाण्याने जळून खाक झाली होती.असाच प्रकार देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा येथील शेतकरी बांधवांच्या बाबतीत घडला.त्यानुसार त्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस शेतात तुटून पडलेल्या तारा,बंद पडलेल्या डिपी व बंद असलेले कृषी पंपाचे वीज मीटर दुरुस्ती करण्याची मागणी केली.मात्र देसाईगंज विद्युत वितरण कंपनी कडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याने जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज आम आदमी पक्षाकडे धाव घेतली.धाव घेताच वितरण कंपनीस निवेदने सादर करून तुटलेल्या तारा व काही नवीन डीपी लावण्यात आले.मात्र शेतकरी बांधवांच्या शेतातील तुटलेल्या विजेच्या तारा बदलण्यासाठी पैसे घेण्यात आले आहे.एवढेच नाही तर डीपी आणण्याचे भाडेही त्यांच्याकडून घेण्यात आले असल्याचे जुनी वडसा येथील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.

सर्व काही करुनही अजून पावेतो कृषी मीटर बंद अवस्थेत आहेत.कृषी पंपाचे मीटर बंद असूनही भरमसाठ विद्युत बिल येत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.विजेचा वापर कमी व बिल जास्त येत असल्याने भली मोठी रक्कम आणावी कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी पाऊस दडी मारून बसतो,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी कर्जाचे डोंगर काळजाला भिडून जाते.सततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधव आत्महत्येचे पाऊल उचलतांना दिसून येतात.अशातच देसाईगंज विद्युत वितरण कंपनी अंगाला हळद लावीत नसल्याने अजूनही बरीचशी कृषी पंपाचे मीटर बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे बिल भरमसाठ येतो; असे बिल भरणे न परवडणारे असल्याने जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी एकमत करून ज्याप्रमाणे विजेच्या तारा बदलण्यासाठी पैसे घेण्यात आले व डीपी आणण्याचे भाडे घेण्यात आले; त्याच प्रमाणे साहेब..! तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या….मात्र बंद पडलेले कृषी मीटर सुरू करा हो..अशी आर्त हाक जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!