गोंदिया :-तरुणाचे आधार कार्ड,पॅन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून क्रेडिट कार्डच्या आधारावर तरुणाच्या नावावर ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले.त्या कर्जाच्या रकमेतून सोने व इतर साहित्य आरोपींनी घेतले.या प्रकरणातील मुख्य आरोपीसह या कामात सहभागी असणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१५ नोव्हेंबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान हा प्रकार करण्यात आला.
सावधान…! तुमच्याही बाबतीत घडू शकतेय; तरुणाच्या नावावर दुसऱ्यांनीच उचलले ३५ लाखाचे कर्ज.. – फसवणुकीचा १३ जणांवर गुन्हा दाखल; गडचिरोलीतील दोघेजण
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आमगाव तालुक्यातील शिवजीनगर बनगाव येथील विजय कुशन कोरे वय ३३ वर्षे या तरुणाचे उत्पन्न ४ लाख ८० हजार असतांना आरोपींनी ९४ लाख रुपये त्याचे उत्पन्न दाखवून त्याच्या नावावर ३५ लाखांच्या कर्जाची उचल विविध बँकेतून केली.त्याचा मोबाइल व ई-मेल आयडी हॅक करून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी ३५ लाखांचे कर्ज घेतले.त्या कर्जाच्या रकमेतून सोने व इतर साहित्य खरेदी करून विजय कोरे यांच्या नावाने बिल तयार केले.आयटीआर चुकीच्या पद्धतीने रिव्हाइस करून त्यांची ९४ लाखांचे उत्पन्न दाखवित कर्जाची उचल केली.विजय कोरे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने आमगाव येथील न्यायालयाच्या आदेशावरून आमगाव पोलिसांनी १३ आरोपींवर भादंविच्या कलम ४२०,४२३,४६४,४७१,३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी,६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तिरूपती राणे करीत आहेत.
या आरोपींचा समावेश 👇
या प्रकरणात आरोपी मनोज हिरालाल जुनघरे,रा. गोकुळ नगर गडचिरोली,मंगेश लालाजी दुर्गे,रा.गोकुळनगर गडचिरोली,निखिलकुमार नरेंद्रसिंह कोसले रा.कमल विहार ४ रायपूर (छत्तीसगड),विकीसिंग नरेंद्रसिंग कोसले वय ५७ वर्षे कमल विहार सेक्टर ८ रायपूर,नीलेश लोकेश सुनहरे रा.कमल विहार सेक्टर ८ रायपूर,संगीतासिंग कोसले रा.सी ५७ कमलीवार सेक्टर रायपूर छत्तीसगड,आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड कंपनीमधील अधिकारी व इतर अधिकारी अशा १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

