Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! ठगबाज तुम्हालाही करू शकतात 'डिजिटल अरेस्ट'... - ठगांनी डॉक्टरला घातला...

सावधान..! ठगबाज तुम्हालाही करू शकतात ‘डिजिटल अरेस्ट’… – ठगांनी डॉक्टरला घातला २.८० कोटी रुपयांना गंडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उत्तर प्रदेशमध्ये सायबर भामट्यांनी संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय)मधील न्यूरोलॉजिस्टची फसवणूक करून त्यांच्या खात्यातून तब्बल २.८० कोटी रुपये काढून घेतले आहेत.सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ठगांनी डॉक्टरांना सहा दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ मध्ये ठेवले होते.डॉक्टर रुचिका टंडन यांच्यासोबतच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.फसवणूक करणाऱ्यांनी रुचिका यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचे नाव आल्याचा दावा करून धमकावत पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.
‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ मध्ये सायबर गुन्हेगार पीडितांची फसवणूक करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरात कैद करतात.गुन्हेगार अनेकदा अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून,एआय व्हॉइस किंवा व्हिडीओ तंत्रज्ञान वापरून ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करतात आणि समोरील व्यक्तीला भीती घालतात.
सायबर पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार असे प्रकार सर्रास घडत आहेत. फसवणूक करणारे अनेकदा सीबीआय आणि मुंबई पोलिसांसह नामांकित तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करतात.लोकांना असे कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!