Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीसावंगी आणि आमगाव रेती घाटांतील अवैध रेती उत्खनन प्रकरणी कुणाची विकेट पडणार?...

सावंगी आणि आमगाव रेती घाटांतील अवैध रेती उत्खनन प्रकरणी कुणाची विकेट पडणार? – जिल्ह्यात दोन विकेटी अजूनही कायम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुक प्रकरणी कधी न घडलेली घटना १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी उघडकीस आली होती.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना बुधवार १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी निलंबित करून तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली होती.त्यानंतर, तहसिलदारांची पोलखोल झाल्याने सिरोंचा तहसील कार्यालयाचे तहसीलदार नीलेश होनमोरे यांनाही निलंबित करण्यात आले.शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी शुक्रवार ७ नोव्हेंबरला निलंबन आदेश जारी केले होते.विशेष म्हणजे,तलाठी अश्विनी सडमेक यांनी अवैध रेती उत्खनन तथा साठा प्रकरणी तहसीलदार यांना लागोपाठ सहा अहवाल दिले होते.मात्र,त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्यामुळे तलाठी अश्विनी सडमेक यांचे निलंबन रद्द करून पूर्ववत सेवेत रुजू करण्यात आले.मात्र,अद्याप जिल्ह्यात अवैध रेती प्रकरणातील निलंबनाच्या दोन विकेटी अजूनही कायम आहेत.अश्यातच आता रेती तस्करांनी सावंगी आणि आमगाव रेती घाटांवर डल्ला मारणे सुरू केल्याने चौकशी झाल्यास अवैध रेती उत्खनन प्रकरणी कुणाची विकेट पडणार? हे सांगता येणार नाही.
अवैध रेती तस्करीत अनेकांना पाकिटे वाटप केली जात असली तरीही कुणाचे बचाव कार्य केले जात नाही.चोरटे चोऱ्या करून मोकळे होत असतात.त्यातच,काहींना गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय पर्यायच नाही.त्यामुळे ‘इकडे तिकडे चोहीकडे’ अवैध गौण खनिजांची तस्करी करून शासनाच्या महसुलास कोट्यवधी रुपयांचा चुना लावून तरुण वर्गांना गुन्हेगारीच्या खाईत ढकलण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार,मिळणारे पाकीट हे क्षणिक आणि लाख मोलाचे नसून केवळ एका रात्रीचा विचार केला तर
‘पर नाईट’ दोन लाख रुपयांची अवैध रेतीची तस्करी केली जात आहे.एका सप्ताहाचा विचार केला तर तब्बल १४ लाख रुपयांची रोख रक्कम तस्करीच्या मार्गाने मिळत असल्याचे बोलले जात आहे.काही ठिकाणी पकडलेले अवैध रेतीचे टीप्पर सोडून ‘मी किती इमाने इतबारे तुमच्यासाठी काम करतोय’, अशी इमानदारीही काहींनी चालवली आहे.त्यामुळे,रेती तस्करांची चांगलीच चांदी सुरू आहे.यावर आळा घालण्यासाठी आंदोलन उभारावे लागेल की काय?असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!