उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालये शोभेची वास्तू बनल्याने शौचालयाच्या अवती-भवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक शौचालय बांधकामाचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील जणतेंनी नियमित शौचालयांचा वापर करावा,उघड्यावर शौचास बसू नये व हागणदारीमुक्त गाव व्हावा म्हणूनच सार्वजनिक शौचालये ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी बांधली.सुरुवातीला एक ते दोन वर्षे शौचालयांची देखभाल,पाण्याची व्यवस्था,सभोवतालील कचरा व्यवस्थापन व रंगरांगोटी ग्रामपंचायत स्तरावरूनच केली जायची.
मात्र एक ते दोन वर्षांनंतर गावातील सार्वजनिक शौचालयांना जे ग्रहण लागले ते अजूनही ग्रहणाच्या चपाट्यातच शौचालये सापडलेली आहेत.सार्वजनीक शौचालयांची आजची परिस्थिती लक्षात घेता काही शौचालये कुलूपबंद तर काहींची दारे तुटलेली,रंगरांगोटी तर सोडा साधी पाण्याची सोय नाही,त्या काळात लाखो रुपये खर्च करून आज निकामी स्वरूपातील शौचालयांची अवस्था झाली आहे.सार्वजनिक शौचालये हल्ली गावामध्ये उभा व शोभा अशास्थितीत असून सार्वजनिक शौचालयांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सार्वजनिक शौचालयांची अशी अवस्था असेल तर इतर सार्वजनिक ठिकाणांची अवस्था कशी असेल. तरी याकडे गांभीर्याने लक्ष घालून सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून गावातील शौचालये योग्य स्थितीत सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.