उद्रेक न्युज वृत्त
मुनिश्वर बोरकर,गडचिरोली
गडचिरोली :- सार्वजनिक बाधकाम क्र.१ गडचिरोली येथील सर्कीट हाऊस व रेस्ट हाऊस बुक करणाऱ्या बाबुची भाषा ही अरेरावी व उद्धटपणाची वागणूक असुन तो नेहमीच १२ चे नंतर येतो व कुठेतरी निघुन जातो.मिळालाच तर उद्या या बुकींग संपले मला एकच काम आहे काय? असे उध्दट उतर देत असतो.अश्या प्रकारची बुकींग करणाऱ्या अनेकांची तक्रार असुन याला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली यांनी आवर घालावा किंवा त्यांची बदली करण्यात यावी.अश्या प्रकारचा आरोप रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष मुनिश्चर बोरकर यांनी केला आहे व या संबंधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
केलेल्या आरोपात बोरकर यांनी सांगितले की, संबधित कार्यालयील बाबु यांचेकडे सर्कीट हाऊस किंवा रेस्ट हाऊस बुक करावयास गेले तर संबंधित बाबु दररोजच १२ वाजता नंतर कार्यालयात येतात. यांना संबधित अधिकाऱ्यांकडून जनुकाही तश्या प्रकारचा आदेशच आहे की काय? एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यालया समोर १२ चे नंतर भेटा.अश्या प्रकारची सुचना सुध्दा संबधित बाबूंनी लिहून ठेवली आहे.बुकींग साठी गेले तर बाबु,कॉम्प्लेक्स कधी बॅकेत तर कधी टपरीवर बसलेला दिसतो आणि जर का भेटालाच तर बुकींग नाही हे त्याचे सर्वप्रथम उत्तर असते.

कदाचित बुकींग केलीच तर पुर्वीच बुकींग झाली तरीही बुकींग करतो.बुकींग करणारा रेस्ट हाऊस गेला तर तिथे पुर्वीच बुकींग झालेलीअसते असे अनेकदा घडले आहे.असे ऐकविण्यात येत की चिरीमिरी घेऊनही बुकींग करून देतो.बुकींग चा त्रास व अनुभव अनेकांना आलेला आहे.अश्या अनेकांच्या तक्रारी असल्याचे बोरकर यांनी म्हटले आहे.दुसरे महत्वाचे की इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस मधील रोजंदारी वर काम करणारा हा त्यापेक्षाही स्वतः ला अधिकारी समजतो.तो तर बुकींग असले तरीही वापस पाठवितो व त्यांच्या खास ओळखिच्या व्यक्तींना दिवस रात्र मोफत रेस्ट हाऊसची रूम उपलब्ध करून देतो व तो तर चिरिमिरी घेण्यात बस्वादच असल्याचे अनेकांचे म्हणणे असल्याचे बोलले जात आहे.यांच्यावर संबंधित अभियंत्यांचा धाकच राहीला नाही.बुकींग करणाऱ्या व्यक्तींना त्रास देणाऱ्या कर्मचार्यांना आवर घालावा; अन्यथा त्यांना तिथुन हाकलावे; अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी केली आहे .
