- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसथांब्याजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या अमोल दामोदर बावस्कर या २५ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने अचानक मृत्यू झाला होता.अमोल हा उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी ठरला होता. अशातच आता आज,शुक्रवारी ११ एप्रिलला इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.संस्कार सोनटक्के वय १२ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थी हा शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ विद्यालयात इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होता.
संस्कार हा आज शुक्रवारी शाळेत गेला होता.शाळेतून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले.त्यातच बऱ्याच दिवसांपासून त्याला उष्मघाताचा त्रास जाणवू लागत.मात्र,त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.घरी परतल्यानंतर त्याची अचानक प्रकृती बिघडली. घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी संस्कारला बुलढाणा येथे प्राथमिक उपचार केले.प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले.अशातच संस्काराची आणखी प्रकृती खालावल्याने त्यातच त्याची प्राणज्योत मावळली.घटनेची माहिती अकोला येथील रुग्णालयातून बुलढाणा रुग्णालयास कळविण्यात आली.सदर घटनेने संस्काराच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे.दिवसा उन कडकू लागले असून नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी,भर उन्हात बाहेर पडू नये,असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

