Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीसमोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना बस झाली पलटी…-वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर...

समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना बस झाली पलटी…-वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर जखमी; अहेरी आगाराची बस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 गडचिरोली :- जिल्ह्यातील अहेरी येथून अमरावतीला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा धनुर जवळ अपघात झाला.या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.ही बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाल्याचे कारण समोर आले आहे.सर्व जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अहेरी आगाराची बस जवळपास २७ प्रवाशांना घेऊन सकाळी ८.३० वाजता अमरावती करीता निघाली होती.अहेरी वरून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली.

यामुळे प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली.काहींनी भीतीने आरडा-ओरड केली.या अपघातानंतर रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले.त्यानंतर जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!