उद्रेक न्युज वृत्त
छत्तीसगड :- येथील संचालित महादेव बुक या ऑनलाइन सट्टा ॲपचा मास्टरमाईंड सौरभ चंद्राकर लग्न करणार आहे.तो मलेशियात त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत सातफेरे घेणार आहे.त्याने तिच्यासाठी तब्बल ३५ कोटींची अंगठी बनवली आहे.व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला तो तिला अंगठी घालणार आहे.
सौरभ चंद्राकर हा दुबईत बसून देशभरात बेकायदेशीर सट्टेबाजीचा व्यवसाय करतो.त्याच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली आहे. तो ज्या मुलीशी लग्न करणार आहे ती दुर्गची असून त्याची शाळेची प्रेयसी असल्याचे सांगितले जात आहे.
दुर्गमधील अनेकांना त्याच्या लग्नाची पत्रिकाही पाठवण्यात आल्या आहेत.एंगेजमेंट आणि लग्न पूर्ण शाही ग्लॅमरमध्ये होणार आहे.यासाठी त्याने जय्यत तयारी सुरू केली आहे.