Tuesday, June 16, 2026
Homeगडचिरोलीसखी वन स्टॉप सेंटरचे मार्कंडादेव येथे जनजागृतीपर कार्यक्रम

सखी वन स्टॉप सेंटरचे मार्कंडादेव येथे जनजागृतीपर कार्यक्रम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे ‘सर्वांना समान न्याय’ अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

१७ मार्च २०२३ रोजी आयोजीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात अंतर्गत जनहीत बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था,येणापूर यांच्या पथनाट्यातून गावकऱ्यांना कौंटूबिक हिंसाचार कायदा,बालविवाह, स्त्रीभृणहत्या व हुंडाबळी या विषयावार पथनाट्य सादर करीत सखी वन स्टॉप सेंटर ची माहिती देवून माहितीपर पत्रकांचे वितरण करण्यात आले.

केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ही कोणत्याही हिंसाचारातील पीडीत महिला व मुलींना वैद्यकीय मदत,समुपदेशन,कायदेविषयक मदत, पोलीस मदत आपतकालीन सेवा तथा तात्पुरता निवास सेवा व पुनर्वसन अशा अनेक सेवा एका छताखाली उपलब्ध करुन देणारी एक विशेष योजना आहे.अशी माहिती या कार्यक्रमा अतंर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,प्रकाश भांदककर व बाल कल्याण समिती अध्यक्षा वर्षा मनवर यांच्या मार्गदर्शनात केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार यांनी उपस्थितांना दिली.तसेच अशी पीडीत महिला व मुली आढळल्यास तात्काळ १८१ महिला हेल्पलाईन, 07132-295675 व 9637976915 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव राजेंद्र पाटील,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वर्षा मनवर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन महिलांविषयक कायदे व योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मार्कंडादेवचे सरपंच,मार्कंडादेवस्थान समितीचे सचिव यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले तथा मोनिका वासनिक, वन स्टॉप सेंटर गडचिरोली व रवींद्र बंडावार,जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी मेहनत घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!