Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
या कालावधीत शस्त्रे,स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे,दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे जमा करणे, चिथावणीखोर घोषणा,भाषणे,गाणी,फलक किंवा अन्य साहित्याद्वारे सार्वजनिक शांतता भंग होईल, अशा कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
तसेच उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणुका,सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष,संघटना व इतरांकडून आंदोलन,मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!