Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनेक राजकीय पक्ष,संघटना व नागरिकांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे,मोर्चे, आंदोलन,सभा,मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता लक्षात घेता गुरुवार,२३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपासून ते येत्या ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे.जमावबंदी आदेशाच्याकालावधीत शस्त्र,सोटे,तलवारी,भाले,लाठ्‌या, बंदुका किंवा शरीरावर इजा करण्यासाठी वापरता येतील, असे इतर कोणतेही उपकरण आणि दाहक व स्फोटक पदार्थ सोबत ठेवण्यास पूर्ण मनाई राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती,त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्या दर्शविण्याने समाजात असंतुलन निर्माण करणारे प्रदर्शन, अशोभनीय घोषणाबाजीस मनाई राहणार आहे.जमाव, मिरवणुका,मोर्चे किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस ठाणे अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!