Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात उद्या दिनांक-११ फेब्रुवारी पासून इयत्ता १२ वी व येत्या २१ फेब्रुवारीपासून  इयत्ता १० वी ची परिक्षा सुरु होणार आहेत.तसेच येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.तसेच काही विविध राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा,मिरवणुक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार १० फेब्रुवारी चे ००.०१ वाजता ते येत्या २४ फेब्रुवारी चे २४.०० वाजता पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७ (१)(३) लागु  करण्यात आलेले आहे.त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे.त्याकरिता पुढील गोष्टींना मनाई करण्यात आली आहे. शस्त्र,सोटे,तलवारी,भाले, दंडे,बंदुका,सुरे,काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल,अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे,कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे,किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,जाहीरपणे घोषणा करणे,गाणी म्हणने,वाद्य वाजविणे,ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल,अशी आवेशपूर्ण भाषणे करणे,हावभाव करणे,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे,फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही मिरवणूक काढू नये,पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश संपुर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या क्षेत्राकरीता लागु असणार असल्याचे गडचिरोली जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेशीत केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!