Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीशेळी गट वाटपाकरीता २८ फेब्रुवारी पर्यंत अर्ज आमंत्रित- अनुसूचित जमाती व वनपट्टेधारक...

शेळी गट वाटपाकरीता २८ फेब्रुवारी पर्यंत अर्ज आमंत्रित- अनुसूचित जमाती व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना मिळणार शेळी गट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- अनुसूचित जमाती व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना शेळी गट वाटप करण्यात येणार असून प्रकल्प कार्यालय गडचिरोली करीता १३८ लाभार्थ्यांकरीता ३१.८२ लक्ष निश्चित करण्यात आलेले आहे.या कार्यालया अंतर्गत येत असलेले गडचिरोली,चामोर्शी, धानोरा,आरमोरी,कुरखेडा,वडसा,कोरची तालुक्यातील वनहक्क कायदाद्वारे वनपट्टा प्राप्त झालेले अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी शेळी गट मिळण्यासाठी अर्ज २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे  सादर करावे.  

योजनेच्या अटी शर्ती:- 

लाभार्थी हा अनुसूचित जमाती व वनपट्टेधारक असावा; वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र,शेळायांना पिण्याच्या पाणी उपलब्ध असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक आहे. वनपट्टेधारक शेतकरी अथवा त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी सदर योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागामार्फत घेतलेला नसावा.याबाबतचे सक्षम प्राधिकारी,संबंधित ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणत्र जोडणे आवश्यक आहे.

वनपट्टेधारक शेतकरी यांना मिळालेले शेळी गटाची विक्री करता येणार नाही किंवा एकाच लाभधारक कुटूंबाकडे एकापेक्षा अधिक लाभधारकांचे पशु एकाच ठिकाणी संगोपित केली जाणार नाही.वनपट्टेधारक शेतकरी यांनी अटी व शर्तीनुसार रुपये १००/- मुद्रांकावर करारनामा करुन देणे बंधनकारक राहिल. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!