- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शेतीकाम आटोपून शेत तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल,शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या देवरी तालुक्यातील मुरदोली येथे घडली.घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली.मात्र,रात्र झाल्यामुळे मृतदेहाचा शोध घेता आला नाही.योगेश रोशनलाल सय्याम वय २२ वर्षे,रा.मुरदोली असे मृत युवकाचे नाव आहे.
दरम्यान आज,रविवार दिनांक-६ ऑक्टोंबरला सकाळी ८ वाजता गोंदिया येथील रेस्क्यू टीमने योगेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले.पुढील तपास देवरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

