Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीप्रणय खुणे 'मानद डॉक्टरेट उपाधी' ने सन्मानित... -जागतिक स्तरावर प्रणय खुणे...

प्रणय खुणे ‘मानद डॉक्टरेट उपाधी’ ने सन्मानित… -जागतिक स्तरावर प्रणय खुणे यांच्या कार्याची दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दरवर्षी देशभरातील प्रत्येक राज्यातून सामाजिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जागतिक स्तरावरील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने ‘मानद डॉक्टरेट उपाधी’ ने सन्मानित करण्यात येते.अशातच गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले प्रणय खुणे यांनी जिल्ह्यत केलेल्या मानवाधिकार क्षेत्रात (मानवी हक्क,ग्राहक संरक्षण)विषयवार उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच तत्पूर्वी शासकीय सेवेदरम्यान विविध गाव खेड्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल जागतिक स्तरावरील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने घेण्यात आल्याने खुणे यांना काल,शनिवार दिनांक-५ ऑक्टोंबर रोजी चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय गुरुकुल येथे ‘मानद डॉक्टरेट उपाधी’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
प्रणय खुणे हे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली येथील रहिवासी आहेत.खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी,बहुल,नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधव तसेच इतर गोर-गरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्या,अडी-अडचणी तसेच संकटकाळी धाऊन जात ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबवित अनेकांना मदत केली. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संघटनेच्या माध्यमातून ‘मानवी हक्क आणि कर्तव्य’ याबाबत विशेष कार्य करून यात मोलाची भूमिका बजावली आहे.सामाजिक क्षेत्रात व प्रामुख्याने मानवाधिकार (मानवी हक्क व ग्राहक संरक्षण) क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दलची दखल घेत डॉक्टर ऑफ सोशल वर्कचे स्पेशलायझेशन इन हुमन राइट्स कंजूमर राइट्स प्रोटेक्शन (मानवी हक्क व ग्राहक संरक्षण) या विषयावर त्यांना चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय गुरुकुल येथे यंदाची ‘मानद डॉक्टरेट उपाधी’ प्रदान करण्यात आली आहे.
यावेळी वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीचे सेलवम,  ग्लोबल एचीवर कौन्सिलचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनात मिस्टर यार कॉनन इंडियन फिल्म डायरेक्टर,ॲड.साथी असलिन,ऑल इंडिया ॲड. फेडरेशन, डॉ.जे.पी.विमल डायरेक्टर शिबा ग्रुप ऑफ स्कूल चेन्नई,डॉ.यूपी कृष्णन, डॉ.जॉन पीटर ओसबॉर्न,फिल्म ऍक्टर सेनेमाराई चेन्नई,मिस्टर स्नेहील,फिल्म एक्टर काम बाम (मीना) सेल्वी,डॉ.मिलिंद दहिवडे मेंबर ऑफ मायनॉरिटी कमिशन दिल्ली, डॉ.पुण्यमूर्ती चेअरमन तमिळनाडू कंजूमर पीपल राईट प्रोटेक्शन मुव्हमेंट चेन्नई व चेन्नई येथील गुरुकुलचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
निवडीबद्दल राष्ट्रीय सल्लागार नाना नाकाडे,कोहळी समाज जिल्हा उपाध्यक्ष विवेक बुद्धे,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा,विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष पायल कापसे,मार्गदर्शक राहुल  झोडे, राकेश डोंगरवार, लोकेश डोंगरवार,विदर्भ अध्यक्ष जावेद अली,विदर्भ सचिव अनिल गुरनुले,संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे,देवानंद खुणे,भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू समरीत,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश गजपूरे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष मुन्ना दहाडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष मंगेश कऱ्हाडे,जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम गोबाडे,कृष्णा वाघाडे,जिल्हा संघटन सचिव स्वप्नील मडावी, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर,मुलचेरा तालुकाध्यक्ष सचिन विश्वास,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी,उपाध्यक्ष लक्ष्मीताई कन्नाके,तेजस्विनी भजे,जाहेदा शेख सह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रणय खुणे यांना ‘मानद डॉक्टरेट उपाधी’ ने सन्मानित करण्यात आल्याने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!