Saturday, September 19, 2026
Homeउमरेडशेतात उभे असतांना जवळच कोसळली वीज; पतीचा मृत्यू,तर पत्नी थोडक्यात बचावली..

शेतात उभे असतांना जवळच कोसळली वीज; पतीचा मृत्यू,तर पत्नी थोडक्यात बचावली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
उमरेड(नागपूर):-शेतात मिरचीच्या पिकाची डवरण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जवळच कोसळलेल्या विजेमुळे मृत्यू झाला,तर पत्नी थोडक्यात बचावली.मात्र, जोडीतील एका बैलाला दुखापत झाल्याची घटना उमरेड तालुक्यातील अकोला शेतशिवारात काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.महादेव शिवराम साखरकर वय ७० वर्षे,रा.अकोला,ता.उमरेड,जि.नागपूर असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
महादेव साखरकर हे पत्नी कलावतीसोबत शेतात मिरचीच्या पिकाची डवरण करण्यासाठी गेले होते.
शेतात काम करीत असतांना सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महादेव व त्यांची पत्नी शेतातील झाडाखाली आडोशाला गेले.काही वेळाने पाऊस उघडताच महादेव यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.दरम्यान,काम करत असतांनाच आकाशात जोरात कडाडलेली वीज थेट त्यांच्या जवळ कोसळली.यात ते गंभीररीत्या होरपळल्याने महादेव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर जोडीतील एक बैल किरकोळ जखमी झाला.त्यांच्या पत्नी व जोडीतील दुसरा बैल मात्र थोडक्यात बचावला. माहिती मिळताच महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उमरेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बोगस डॉक्टरांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून मोहीम..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात फोफावलेल्या अनधिकृत व बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश...

देसाईगंज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; शेतीचे नुकसान..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात काल शुक्रवारच्या रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावून शेतकरी बांधवांना एकप्रकारे दिलासा दिला.तर काही ठिकाणी वेगवान वाऱ्याने...

आता गडचिरोली जिल्ह्यात मांगूर माशाचे मत्स्यपालन,प्रजनन,मत्स्यबीज संचयन,खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यपालक,मच्छिमार,मत्स्य सहकारी संस्था,मत्स्य शेतकरी,मत्स्यबीज विक्रेते,मासे विक्रेते तसेच नागरिकांनी प्रतिबंधित परदेशी मांगूर (वागुर)माशाचे पालन,संवर्धन,प्रजनन,मत्स्यबीज निर्मिती व संचयन तसेच खरेदी,विक्री,वाहतूक अथवा साठवणूक...

प्रवासी बस उलटली; सात प्रवासी गंभीर जखमी,तर ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवनीजवळ आज,शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून प्रवासी बस रस्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!