उद्रेक न्युज वृत्त
सोलापूर :- शेतकऱ्याने ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्याला व्यापाऱ्याने फक्त दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.सोलापुरात हा प्रकार घडला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही बाब समोर आणली आहे.व्यापाऱ्याने शेतकऱ्याला फक्त दोन रुपयांचा चेक दिला नाही; तर पुढील १५ दिवसानंतर तो वठणार असे सांगितल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.असल्या प्रकाराबद्दल राज्यकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजेंद्र तुकाराम चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने १० पोती कांदा विकला होता.५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती ५१२ रुपये येणे अपेक्षित होते.मात्र ५०९ रुपयांचा खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये आले आहेत.या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि १५ दिवसांनी वठेल असे सांगितले. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.