Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! येत्या सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील बोनस वाटपाला होणार सुरुवात.. -पहिल्या...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! येत्या सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील बोनस वाटपाला होणार सुरुवात.. -पहिल्या टप्प्यात ४८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देत १०४ कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला आहे.या बोनसच्या माध्यमातून ४८ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ देण्यात येणार आहे.
बोनस वितरणासाठी शासनाकडून १२० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून त्यापैकी १०४ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.तर उर्वरित शिल्लक १६ कोटी रुपये येत्या,सोमवार ७ जुलै रोजी बँक खात्यांमध्ये जमा होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वाटपाला गती मिळणार आहे.
शासनाने हेक्टरी २० हजार रुपये या दराने,अधिकतम दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आर्थिक आधार मिळणार असून उत्पन्न व उत्पादकता वाढीस हातभार लागणार आहे.बोनस वाटपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून उर्वरित रक्कमही लवकरच उपलब्ध होऊन सर्व लाभार्थ्यांना बोनस दिला जाईल,असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!