उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघठिका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात आज २१ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.दोन गुजराती मिळून एक मराठी माणसाचा स्थानिक पक्ष फोडतात,संपवतात ते देखील दुसऱ्या एका मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आणि मराठी असलेली पण बुद्धी गहाण ठेवलेली भक्त मंडळी या सर्व प्रकारचा आनंद घेतात या महाराष्ट्रात दुर्दैवी गोष्ट काय? केन्द्र सरकारच्या दबावात येऊन दबावतंत्र बळी पडलेल्या धृतराष्ट्राची भूमिका वटविनाऱ्या लाचार केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळपक्षाचे नाव व चिन्ह बहाल करणाऱ्या निवडणूक आयोगाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा महिलाआघाडी संगठिका यांनी निषेध केला . प्रसंगी शिवसेना महिला संगठिका छायाताई कुंभारे, माजी जि.प.सदस्य उपजिल्हा संगठिका सुनंदा आतला,तालुका समनव्यक नूतन कुंभारे,शहर समनव्यक स्वाती दासेवर,उपशहर संगठिका सिमा परासर,शाखा प्रमुख ज्योशना राजूरकर, शाखा प्रमुख देवकी कंकडावार,शाखा प्रमुख गीता सोनूले,शाखा प्रमुख संदया हेमके,कारवाफा सरपंच महानंदा आतला, प्रभारी तालुका प्रमुख आरती खोब्रागडे आदी महिला उपस्थित होत्या.