उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सार्वजनिक युवा वीर मराठा मंडळातर्फे दोन दिवसीय शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवाजी महाराजांच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव निमित्ताने काल १८ फेब्रुवारी ला विविध कार्यक्रमांचा उद्घाटनिय सोहळा पार पडला.जयंती सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ॲड.संजय गुरू यांना बहुमान मिळाला.शिवपूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनिय सोहळ्या प्रसंगी ॲड.संजय गुरू बोलत असतांना,आजची तरुणाई शॉर्टकट मार्ग अवलंबतांना दिसून येत असून; सदर मार्ग हा जास्त काळ टिकणारा नाही म्हणून तरुणांनी शॉर्टकट मार्गाने न जाता स्वतःच ध्येय निच्छित करून यशाकडे वाटचाल करावी; शिवरायांनी कधीही शॉर्टकट मार्ग अवलंबिला नाही.त्यामुळेच त्यांनी मोठ-मोठ्या शत्रूंवर मात करून,संपूर्ण जगात प्रतिष्ठा जपली तर ‘शिवजयंती प्रतिष्ठेची नसली तरी चालेल; पण निष्ठेची असावी’ असे मत ॲड.संजय गुरू यांनी व्यक्त केले.
उद्घाटनिय सोहळ्या नंतर नृत्य स्पर्धा व २९ जानेवारीला घेण्यात आलेला निबंध स्पर्धा,सामान्य ज्ञान,चित्रकला व गावातील दहावी आणि बारावी तून येणारे प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक येणाऱ्यांना शहीद कॉ.गोविंद पानसरे लिखित’ शिवाजी कोण होता?’ पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. शिवजन्मोत्सव उत्सव निमित्ताने शिवभक्तांनी मोठ्या सहभाग नोंदवला होता तर प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थी व गावातील सरपंच सोबत महिलांनी सुद्धा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
उद्घाटनिय सोहळ्या दरम्यान कार्यक्रमाचे मार्गदर्शक मनोज काळबांधे पोलिस निरीक्षक आरमोरी,अध्यक्षा अपर्णा राऊत सरपंचा,रोशनी पारधी माजी महिला बालकल्याण सभापती,गजानन सेलोटे उपसरपंच, किरणताई कुंभलवार पोलिस पाटील,नितीन राऊत माजी उपसभापती,सुनील पारधी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष,भाऊराव पत्रे मुख्यधापक गौर नगर, शेषराव नागमोती सदस्य ग्रां.पंच्यायत,माजी सरपंच मंगला शेंडे,प्रवीण रहाटे पत्रकार देशोन्नती,संदीप वाघडे सदस्य,नलिना वालदे सदस्य,भुमेश्वरी गुरणुले, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,भास्कर पत्रे तंटामुक्त समिती उपाध्यक्ष, श्रीराम बुराडे,निखिल गोरे, संदीप साबळे,बाबुराव राऊत,शिशुपाल वालदे,रेवनाथ झीलपे,गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन सूरज चौधरी,आभार प्रदीप तुपट सर यांनी केले.