Wednesday, June 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशाळेची पहिली घंटा वाजणार 'या' दिवशी..!

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा येत्या,सोमवार १५ जून २०२६ पासूनच करण्यात येणार आहे.यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून,शाळादेखील पारंपरिक पद्धतीनेच ऑफलाईन सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे,शाळा २६ जूनपासून सुरू होणार,वर्ग ऑनलाइन होतील किंवा सुट्ट्या वाढवण्यात येतील अशा अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.शिक्षण विभागाने अशा अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.विद्यार्थी आणि पालकांनी केवळ शासन,शिक्षण संचालनालय किंवा संबंधित शाळांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे. महाराष्ट्रातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेज १५ जूनपासून ऑफलाइन सुरू होणार आहेत.त्याचबरोबर, विदर्भातील वाढत्या उष्णतेचा विचार करून शिक्षण विभागाने विशेष व्यवस्था केली आहे.१५ जून ते २९ जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या प्रखर उन्हाचा त्रास होणार नाही.त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रकानुसार शाळा सुरू राहतील.राज्यभर एकसमान शैक्षणिक दिनदर्शिका लागू करतांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!