- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि विविध सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.विद्यार्थी व शिक्षकांसाठी दिवाळीची सुट्टी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार,१४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.या कालावधीत दिवाळी सणाचे विविध दिवस जसे की धनत्रयोदशी(६ नोव्हेंबर), दिवाळी पाडवा/बलिप्रतिपदा (१० नोव्हेंबर)आणि भाऊबीज (११ नोव्हेंबर)या सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्यांचा समावेश असेल.सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.
माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सत्रांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे.चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र हे सोमवार,१५ जून २०२६ पासून सुरू झाले असून ते शनिवार,३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत राहील.दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील.द्वितीय सत्र हे १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे.त्यानंतर सोमवार,३ मे २०२७ ते सोमवार,१४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहील.दरम्यान,माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत,याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.
- Advertisement -

