Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीविविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. - ५ लाखांपासून ते ५०...

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि उद्योजकतेला चालना मिळावी,या उद्देशाने विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.),गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या मुख्य कंपनीसह वडार समाजासाठी पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ,रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,लोहार समाजासाठी ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ,गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि नाथपंथी समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा उपकंपन्यांमार्फत विविध स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांअंतर्गत कृषी संलग्न व्यवसाय,लघुउद्योग, वाहतूक व्यवसाय,तांत्रिक व्यवसाय,पारंपरिक व्यवसाय तसेच विविध सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका आणि महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना उपलब्ध आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत,तर गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.या योजनांमध्ये लाभार्थ्याने बँकेकडे मुद्दल व व्याजाची नियमित परतफेड केल्यानंतर महामंडळाकडून १२ टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात परत जमा केली जाते.
याशिवाय बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असून त्यामध्ये ७५ टक्के बँकेचा आणि २५ टक्के महामंडळाचा सहभाग राहतो. महामंडळाच्या सहभागाच्या रकमेवर केवळ ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.तसेच,थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे.या योजनेमुळे अल्पभांडवल असलेल्या तरुणांना व उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.
या सर्व योजनांच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील पात्र नागरिक,युवक,महिला,स्वयंरोजगार करू इच्छिणारे उद्योजक तसेच संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.),गडचिरोली यांनी केले आहे.
संपर्कासाठी👇
जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
आयटीआयच्या मागे,कॉम्प्लेक्स,गडचिरोली– ४४२६०५.
दूरध्वनी : ०७१३२-२२३०२६
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!