उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली:- जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी व इतर पेंडूलम आपल्या घरगुती व खाजगी कामाकरीता शासकीय वाहनांचा वापर करीत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेच्या वाणीतून गुंजू लागली आहे.
जील्ह्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर विविध सरकारी कार्यालये असून,प्रत्येक विभागातील कार्यालयांना शासनाने ‘महाराष्ट्र शासन’ या नावाने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहेत.उपलब्ध करून दिलेली वाहने ही खाजगी कामांव्यतिरिक्त इतर शासकीय कामांसाठी आहेत.मात्र काही अधिकारी,विभाग प्रमुख कार्यालये सोडुन इतर वरिष्ठ अधिकारी व कार्यालयातील विभाग प्रमुख हे कार्यालयातील शासकीय वाहनांचा वापर खासगी कामाकरिता वापरत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
खाजगी कामामध्ये वाहनांच्या समोर व मागील बाजूस ‘महाराष्ट्र शासन’ असलेल्या नावाची पाटी लावुन स्वगावी जाणे,लग्न समारंभास जाणे,विविध प्रकारच्या कार्यक्रमास हजेरी लावणे व इतर अशा बऱ्याच खाजगी कामाकरिता शासकीय वाहन उपयोगात आणले जात आहे.काही अधिकारी व कर्मचारी चक्क बिअर बार मध्ये सुद्धा अंधाराचा फायदा घेऊन वाहन नेत असतात.
खासगी कामाकरिता नेलेल्या वाहनांचा ताळमेळ केल्या जातो.यात प्रामुख्याने सुरुवातीला एका कच्या नोटबुकावर नोंदी घेतल्या जातात व नंतर कच्या बुकातील नोंदींची ताळमेळ करून पक्क्या लॉगबुकवर नोंदी घेतल्या जातात.खाजगी कामात वापरले जाणारे वाहन सुट्टीच्या दिवसातील वा इतर दिवसातील वेगवेगळ्या स्वरूपाचे दौरे दाखवून लॉगबुकवर नोंदी घेतल्या जातात.यामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात येत नसल्याने सर्रासपणे व राजरोसपणे शासकीय वाहनांचा वापर खासगी कामाकरिता केला जातो आहे.शासकीय वाहन खाजगी कामांकरिता नसून ते कार्यालयीन वापरा करिता असल्याने त्याचा वापर केवळ शासकीय कामात केला गेला पाहिजे.
यावर त्वरित आळा बसण्याकरिता शासनाने ठोस पावले उचलून,अशा प्रकारांवर निर्बंध घातले पाहिजे.अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.