उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :- दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असुन परीक्षेदरम्यान होणारी पेपरफुटी टाळण्यासाठी आता विद्यार्थ्यांना परीक्षेला ३० मिनिटेआधीच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर प्रवेशास बंदी घालण्यात आली असल्याचे सुचनापत्र बाेर्डाने जारी केले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी व बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे.बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी ३ मार्च रोजी गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे समोर आल्याने सदर प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाली आहेत.त्यामुळे मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दुपरी २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यावेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांस परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही,असे मंडळाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सदर गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. तसेच संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस स्टेशनला फिर्याद क्र.००३७ अन्वये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही याची विद्यार्थी,शिक्षक,पालक व सर्व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी,असेही पत्रात म्हटले आहे.