Sunday, July 12, 2026
Homeनागपूरविजय वडेट्टीवार यांची आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल.. - न्यायालयाने नोटीस...

विजय वडेट्टीवार यांची आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल.. – न्यायालयाने नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीमधील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲड.नारायण जांभुळे यांनी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विधानसभा निवडणूक कालावधीत दाखल केली होती.याप्रकरणी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली होती.तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला होता.त्यानंतर न्यायमूर्तिद्वय देवेंद्रकुमार उपाध्याय व नितीन सांबरे यांनी झालेल्या सुनावणीत निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचे सांगून याचिकेची दखल घेण्यास नकार दिला होता.त्यामुळे वडेट्टीवार यांना निवडणूक कालावधीत न्यायालयाकडून एकप्रकारे दिलासा मिळाला होता.जांभुळे यांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतला होता.वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले.तो त्यांच्या पत्नीने स्वतःच्या नावावर खरेदी केला.पत्नीच्या नावे प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाहीत.त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे; तसेच हा स्टॅम्प पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला आहे. मात्र,त्याचा उपयोग प्रतिज्ञा पत्रासाठी करण्यात आला.परिणामी यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात यावे; अशी मागणी जांभुळे यांनी केली होती.अशातच आता परत नारायण जांभुळे यांनी निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत विजय वडेट्टीवार यांची आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी,अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.याचिकेवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची आमदारकी शाबूत राहणार की जाणार हे पुढील सुनावणीत स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!