Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीविकृतीचा कळस..! गर्भवती महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या... - केस...

विकृतीचा कळस..! गर्भवती महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या… – केस दाबण्याचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-लोकांची मानसिकता केव्हा बदलेल,देव जाणे.अशातच विकृतीचा कळस गाठणाऱ्यांना सहकार्य करणारेही किती हुशार म्हणावे लागेल. एखाद्याच्या आई-बहिणींसोबत अनुचित प्रकार घडू नयेत,यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सहकार्य करून केस दाबण्याचा प्रयत्न गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे.शौचासाठी गावालगतच्या झुडपती जंगलात गेलेल्या एका गर्भवती महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून बेड्या ठोकल्या आहेत.नराधमाची नुकतीच पोलिस कोठडीतून रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असून सध्या तो कारागृहात आहे.प्रवीण गोविंदा मंढरे वय ३८ वर्षे, रा.वेलगूर,ता.अहेरी,जि.गडचिरोली असे अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.सदरची घटना १ एप्रिलला घडली असून काल,शुक्रवारी ४ एप्रिलला सर्वत्र उघडकीस आली.पोलीस सूत्रांनुसार,अहेरी तालुक्याच्या वेलगूर गावातील आरोपी प्रवीण मंढरे हा २३ वर्षीय पिडीत गर्भवती महिलेच्या मागे गेला व तिला घट्ट पकडून अतिप्रसंग करू लागला.पीडितेने प्रतिकार करत आरडाओरड केली.आवाज ऐकून गावातील एक व्यक्ती तेथे गेला असता,त्याला पाहून प्रवीण मंढरे याने पळ काढला.महिला ही गावालगतच्या झुडपी जंगलात शौचासाठी गेली होती.आरोपी प्रवीण मंढरे  हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.त्याच्यावर गुन्हा नोंद होऊ नये, यासाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला,पण पोलिसांनी दबाव झुगारुन पीडितेची फिर्याद नोंदवली. पीडितेच्या फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता (बीएनएस)कलम ७४,७५,७६ अन्वये गुन्हा नोंद झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!