Sunday, October 4, 2026
Homeगडचिरोलीवाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या चौकांवर ट्रॅफिक सिग्नल लागल्यामुळे प्रवाशांना बराच वेळ कडक उन्हात थांबून राहावे लागते. प्रखर उन्हाच्या झळा आणि डोक्यावर तळपता सूर्य येत असल्याने यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असल्याची अडचण लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून दुपारच्या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुपारी साडे बारा ते चार वाजेपर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार आहेत.यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे,गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४१ अंशाच्या पुढे गेल्याने प्रखर उन्हाचा तडाखा नागरिकांना सोसावा लागत आहे.यासाठी घेतलेल्या निर्णयाने वाहतूक धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!