उद्रेक न्युज वृत्त :- रवी जनवार यांच्या जीवनाची गाथा अत्यंत संघर्षमय आहे.वडिलांच्या मृत्यूनंतर रवीच्या (सूर्याच्या) होत्याचं नव्हता आधार तुटला.पैशाचे पाठबळ नाही; आप्तांचा आधार नाही, अशी परिस्थिती दु:ख करित बसण्यापेक्षा,दु:खावर मात करून आता त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहल्यावाचून गत्यांतर नाही.त्यांच्या ठायी ज्ञान संपादन करण्याची तीव्र इच्छा होती.पितृ छाया हरविल्याचे महान दु:ख मेंदूच्या मेंदू पटलात व हृदयाच्या एका कप्प्यात ठेवून व आपला जीव मुठीत धरून एम.एस.सी.पर्यंत शिक्षण खडतर प्रवास करून पूर्ण केले.रवी जनवार यांना नेहमी वाटे की,’आपणही सुंदर दिसणाऱ्या जगात महत्तम कार्य करावे; अशी त्यांची अबोल महत्वकांक्षा होती.त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ होई.कुटुंबाचे पालन पोषण केले पाहिजे आणि शिक्षण पुढे चालवावे म्हटले तर पदरी कवडी देखील नाही.कर्तृत्ववान वडिलांचा शेवट संघर्षात गेला हा थरारक अनुभव रवीजी यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला.अशा प्रकारे जीवनकलाच्या तीव्र धुमाळीतून मार्ग कसा काढावा,या विवंचनेत असताना,नोकरी करून कुटुंबांचे संगोपन करावे की,तल्लख व कुशाग्र बुद्धीचे धनी असलेले रवीजी यांनी पुढील उच्च शिक्षण घ्यावे; या प्रश्नाने त्यांच्या मनाला चिंतन करायला लागले.आणि शेवटी कुटुंबाच्या पालनपोषणासाठी नोकरी पत्करावी लागली.
वडील अत्यवस्थ आहेत अशी रवीना जाण झाली.वडील अंथरूणावर पडलेले आणि नातलग,नि , शेजारी पाजारी त्यांच्या अंथरूणापाशी चिंताग्रस्त स्थितीत बसलेले ते दृश्य पाहताच लहान वयातील रवीच्या मनात चर्र-चर्र झाले.मृत्यूशय्येवर पडलेल्या त्या बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्येल्या जनवार गुरूजी या महान शिक्षणतज्ञाने बाल रवीस पाहण्यासाठी कंठी प्राण धरला होता.मुलांच्या वाटेकडे डोळे लावून हा महान शिक्षणतज्ञ बघत होता.डोळ्यात प्राण घुटमळत राहिला होता.”माझा रवी भविष्यात शोषित,पीढीत, मागासवर्गीय व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या साठी महान शैक्षणिक कार्य करिल आणि नि:स्वार्थीपणाने बहुजनांची सेवा करिल आणि मी कष्ट,त्याग, परिश्रमाने लावलेल्या शैक्षणिक रोपटे यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर करील अशी आशा करित आहे; असे म्हणत डोळे उघडले.आपल्या लाडक्या रवीच्या अंगावरून प्रेमाने आपला थरथरता हात फिरविला आणि आपल्या जीवनातील आशेच्या एकमेव सूर्याला (रवी) त्यांनीं डोळे भरून पाहिले, थोड्याच क्षणात त्यांचे डोळे मिटले.आणि एका महान शैक्षणिक कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षण संस्था चालकांची यात्रा संपली.एका शिलवंत संस्था चालकांची यात्रा संपवलेली पाहून रवी हाय मोकलून रडू लागला. त्यांच्या आक्रोशापुढे कोणाचाही शोक ऐकू येईना ‘.
रवीजी उधोगशील, महत्वकांक्षी, स्वाभिमानी जीवन जगत आहेत.विदर्भात नावारूपास आलेल्या गोंडवन विकास संस्था,नागभिड संस्थेचे सचिव म्हणून काम उत्तम रीतीने पार पाडत आहेत.जनवार साहेब यानी आपल्या मनाला थोडासाही अहंकार स्पर्श करू दिला नाही.कारण या सर्व महान तत्वांचा वारसा त्यांचे महान चिंतक व मार्गदर्शक जनवार गुरूजी कडून प्राप्त झाले.रवीजी यांचे संवेदनशील मन,गरीबिबद्दल कावळा,वंचितांच्याबद्दलची आत्मियता आणि चारित्र्याचे गुणाढ्य आहेत.स्वतः ला कल्पना नसेल एवढा बहुजन मित्र परिवार निर्माण केला ही बाब मानवजातीस भूषणावह असा ठेवा आहे.जीवनातील संकोच नि मोह यांना तोंड देण्यास लागणार कणखरपणा,मनोनिग्रह आणि चिकाटी हे गुण त्यांच्या अंगी आजही पहायला मिळतात.वडिलांच्या शिक्षण संस्थेत नोकरी पत्करावी अशी अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षा भंग केला.आंग्ल नाटककार शेक्सपिअर यांच्या नाटकातील ‘प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते, तेव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्याने केला तर, त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते ‘या वचनाप्रमाणे जनवार यांनी संधीचे सोने करून संस्थेचा व आपल्या नावाचा लौकिक वाढविला आहे.रवीजी यांनी “आपल्या लहान वयात उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नाची आज त्यांच्या हातून पूर्तता होतांना दिसत आहे.त्या स्वप्नाना साकार करण्यासाठी आजही ते सतत मेहनत व संघर्ष करित आहेत.ती स्वप्नपूर्तीच एक क्रांति ‘आहे . आणि त्यांच्या प्रयत्नांचा विजय आहे.जनवार या गुणवंत,शिलवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, चारित्र्य संपन्न, मेहनती,उत्साही, धैर्यवान,प्रेमळ, कनवाळू.कर्तव्यदक्ष , आदर्शवादी, मायेच्या ममतेने जवळ घेणारा ममतावादी अशा महान गुणांनी युक्त असणाऱ्या व संघर्षमय जीवन जगणाऱ्या जनवार साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!व उदंड आयुष्य लाभो!आणि पुढील काळात त्यांच्या हातून प्रेरणादायी महान शैक्षणिक कार्य घडो; अशी त्यांच्या जन्मदिनी कामना करतो आणि पुनःच्च उदंड व दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सुभेच्छुक :-डॉ.नामदेवजी खोब्रागडे,विदर्भ अध्यक्ष,बहुजन असंघटित कामगार आघाडी संघ तथा केंद्रीय सरचिटणीस पर्यावरण,जंगल व मानव अधिकार संरक्षण संघटना,नागपूर.