Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीमारदा येथील आदिवासी बांधवांना संविधानाचे महत्व व जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न….

मारदा येथील आदिवासी बांधवांना संविधानाचे महत्व व जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्याच्या पोटेगांव परीक्षेत्रातील मारदा गावात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्य आदिवासी बांधवांना संविधानाचे महत्व व जनजागृतीपर कार्यक्रम काल दिनांक – १४ ऑक्टोंबर २०२३ रोजी पार पडले आहे.

सदर कार्यक्रमाच्या बैठकीचे अध्यक्ष सरपंच मनोहर पोटावी तर मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,बामसेफचे नेते भोजराज कान्हेकर,ज्ञानेश्वर मुजमकर आदि होते.ucc कोड सर्वांसाठी घातक ठरणार आहे.यात समान अधिकार,नो रिझर्व्हेशन,यात उच्च वर्णीय मातब्बरांना फायदा होणार आहे.५ व ६ व्या सुचिमधे पूर्वी वस्तु नेण्याकरीता ग्रामसभेचा ठरावाशिवाय होणार नव्हते; मात्र आता ठरावाची काही गरज राहणार नाही. वनहक्क कायद्यात ‘मावा नाटे मावा राज होता.यापुढे ठेकेदारी पध्तीत जंगल ठेकेदाराकडे जाणार व आपल्याकडे कुठलेही अधिकार राहणार नाहीत. शाळा श्रीमंतांना विकल्या जातील व बंद पाडून इमारती,जागा श्रीमंतांच्या घशात जाणार असल्याने एवढे खतरनाक कायदे तयार केल्या जात आहे.हा सरकारचा ठाव हानून पाडावयासाठी आपल्या एकजुटीची ताकद दाखवायची आहे.यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.असे बामसेफचे भोजराज कान्हेकर यांनी सांगीतले.तर प्रा.मुनिश्चर बोरकर म्हणाले की,संविधान बदलविण्याची भाषा करणाऱ्या सरकारचा ठाव हाणून पाडावयाचा आहे.डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिले त्यामुळे आपण जगत आहात.संविधान वाचविण्यासाठी पुन्हा एक लढा करावयाचा आहे.येत्या संविधान दिनी पोटेगाव येथील होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मुजमकर तर आभार ग्रामसभा जिल्हा संघटक शिवाजी नरोटे यांनी केले.बैठकीला ग्रामसभा अध्यक्ष योगराज कड्यामी,सचिव विश्वनाथ नरोटे,पोलिस पाटिल केशव कड्यामी,तुळसिराम पोटावी,रमेश नरोटे,हरिदास कड्यामी,संदिप सिडाम, अंताराम पदा,खुशाल पोटावी,जानिराम पदा,प्रमोद कड्यामी,सुकदेव मटयामी आदि सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!