- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी घडली.नानाजी नारायण कामडी वय ५३ वर्षे, रा.पळसगाव जाट,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून नानाजी कामडी हे आपल्या शेतात तिळाच्या पेंड्या बांधण्याचे काम करीत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी कापलेल्या तिळाच्या काही पेंड्या घरी नेल्या व परत शेताकडे गेले.सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला.दरम्यान,सायंकाळच्या सुमारास शेतात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.शरीरावरील जखमांवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

