उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एखादी वस्तू खरेदी करताना आपण बिनधास्तपणे खरेदी करतो.कुठे वस्तू स्वस्त असतात तर कुठे महाग, अशावेळी स्वस्त वस्तूच्या ठिकाणी जास्त गर्दी होते. मात्र,अनेकवेळा वजन काट्यांमध्ये दांडी मारली जाते. यामुळे ग्राहकांनी सावध असणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे, मापात गडबड केल्यास संबंधित व्यावसायिकावर खटलासुद्धा दाखल होऊ शकतो.
वजनमापे विभागाच्या वतीने विविध ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जाते.तर ग्राहकांनी तक्रार केल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांवर कारवाई होते. किराणा दुकान,फळविक्रेते,भाजी विक्रेते आदींकडून अनेकवेळा वस्तू देताना ग्राहकांचे नुकसान केले जाते.
याठिकाणी करा तक्रार 👇
आपल्याला वजनामध्ये गोंधळ वाटत असेल तर वजनमापे विभागाकडे ऑनलाइन स्वरूपातही तक्रार दाखल करता येते किंवा ऑफिसमध्ये जाऊनही अशा स्वरूपाची तक्रार करता येते.ज्या तक्रारदाराने तक्रार नोंदविली अशा तक्रारदारांचे नाव वजनमापे विभागाकडे गोपनीय ठेवले जाते.तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित तक्रारदारांना कोणताही त्रास होऊ नये; यासाठी काळजी घेतली जाते.