- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.काल सोमवारच्या संध्याकाळपासूनच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये काही महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत.तर काही महिलांच्या खात्यात आज, मंगळवार २४ फेब्रुवारीला पैसे जमा होणार आहेत.मात्र, ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत.त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल आणि केवायसी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यामागे काही कारणे आहेत.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. तरीही अनेक महिलांनी केवायसी केली नाही. जवळपास ८४ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यातील काही महिलांनी केवायसी केलेली नाही.त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.याचसोबतच ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांची माहिती ई-केवायसीमध्ये समोर आली आहे.त्यामुळे त्या महिलांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. याचसोबत ज्या महिलांची केवायसीमध्ये चूक झाली आहे,त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.त्यांना काही दिवसांनी पैसे दिले जातील.शासनाने लाडक्या बहिणींसाठी शुक्रवार ६ फेब्रुवारीपासून पोर्टल सुरु केले आहे.या पोर्टलवरुन ई-केवायसीची दुरुस्ती ३१ मार्च २०२६ पर्यंत करता येणार आहे.या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
- Advertisement -

