Friday, June 5, 2026
Homeगडचिरोलीरोजगार हमीची भर उन्हात कामे; जीवाची होतेय लाही…तापमान ४२ अंशावर; तब्येत बिघडण्याची...

रोजगार हमीची भर उन्हात कामे; जीवाची होतेय लाही…तापमान ४२ अंशावर; तब्येत बिघडण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उदेक न्युज वृत्त

गडचिरोली :- उन्हाळ्यात रोजगाराची हमी नसल्याने त्यासाठी एकच सर्वसामान्य नागरिक तसेच गोर गरीब जनतेसाठी पर्याय असलेला एकमेव उपाय म्हणून रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली.त्यानुसार ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार मिळाला आहे.सध्या स्थितीत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे जोमात सुरु असून,सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही कामे केली जात आहेत.कामावर महिला मजूरांसह तरूण तसेच ६० वर्षांच्या आतील मजूर आहेत.गेल्या आठवडाभरापासून राज्यभरातील तापमानात वाढ झाली.जिल्ह्यातील तापमान ४२ अंशावर पोहचले आहे.अशास्थितीत रोहयो कामावर राबणाऱ्या मजूरांना ऊन्हाचा तडाखा बसून तब्येत बिघडण्याची शक्यता बळावली आहे.काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी रोजगारलगेगी बोलीवर यामुले सर्वसामान्यांसह करणा-यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आठवडाभरापासून पुन्हा राज्यासह जिल्ह्याचे तापमान वाढू लागले आहे. सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंद करण्यात आले असून गडचिरोली जिल्ह्याचाही पारा सातत्याने वाढत आहे.याचा फटका मजूरांनाही बसत आहे. रोहयो

कामावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरीक काम करीत असतात.यात महिला मजूर वर्गाचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहेत.मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असल्याने रोहयो कामावर असलेल्या महिला मजूरांचेही हाल होत आहेत.याकडे रोहयो विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नवीन रेल्वे लाईन कामाच्या दृष्टीने दोन दिवस मेमू पॅसेंजर गाड्या राहणार रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे येत्या,रविवार ७ जून...

यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता...

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!