Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीरेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्या कागदोपत्रीच....- स्थापनेपासून एकही बैठक वा तपासणी...

रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्या कागदोपत्रीच….- स्थापनेपासून एकही बैठक वा तपासणी नाही…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष,सचिव व सदस्य  नामधारी असल्याने रेशन दुकानातील दक्षता समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. 

ग्राम पातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानांतून वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्याकरिता अध्यक्ष,सचिव,सदस्य अशी १२ अशासकीय पद असलेली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या.अशासकीय समितीमध्ये गावातील अध्यक्ष सरपंच,तलाठी सचिव,सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी,तीन महिला,विरोधी पक्षाचे दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी,अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता इत्यादींचा समावेश आहे.या समितीचे कार्य शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जातो किंवा नाही तपासणे,बनावट,खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी याबाबत आढावा घेणे,धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे,गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक  कार्ये पार पाडली जातात.

या सर्वांचा कालावधी केवळ तीन वर्षांकरिता असतो.तीन वर्षे पूर्ण झाली की नव्याने ग्रामसभेद्वारे अशासकीय पदाधिकारी यांची निवड केली जाते.निवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्यातुन एकदा बैठक घेतली जाते.नियमित बैठका घेऊन बैठकीचा अहवाल तहसीलदार यांना पाठवावा लागतो.सर्व दक्षता समित्यांच्या बैठका वेळच्या वेळी घेतल्या जातात किंवा नाही याची खातरजमा जिल्हास्तरावरील अप्पर जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.मात्र दक्षता समितीतील अशासकीय सदस्यांनी एकही बैठक वा भेटी रास्त भाव दुकानदारांना दिले गेले नसल्याचे निदर्शनास दिसून येते.

दक्षता समितीतील पदाधिकारी जोपर्यंत नामधारी असणार तोपर्यंत कोणत्याही समित्या स्थापन करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही.त्यासाठी ज्यांच्याकडे वेळ व कुवत आहे अशांनाच समितीमध्ये व इतर ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!