उद्रेक न्युज वृत्त
एटापल्ली(गडचिरोली):- एटापल्ली वन नाक्याजवळ पकडलेल्या रेती भरलेल्या दोन ट्रॅक्टरांवर ३० हजार रुपये दिल्यास कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करणार नाही व दोन्ही ट्रॅक्टर सोडून देणार; अशी मागणी करणाऱ्या वनरक्षक धनिराम अंताराम पोरेटी वय ३३ वर्षे यांस तडजोडी अंती १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सापडा रचून रंगेहाथ पकडले असल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सदर वनरक्षक कार्यरत असून एलसीबीच्या पथकाने सापळा रचून केस कर्तनालय (सलून)च्या दुकानात १५ हजार रुपयांची लाच घेतांना पोरेटी यांस रंगेहाथ पकडले आहे.सदरची कारवाई दोन दिवांपूर्वी करण्यात आली.