- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बऱ्यापैकी रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे.त्यामुळे रेती चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे.त्यातच केव्हा-केव्हा अवैध रेतीचे ट्रक,टीप्पर,ट्रॅक्टर वा इतर साधने महसूल कार्यालया व्यतिरिक्त पोलीस विभागातील अधिकारी वा कर्मचारी पडून कारवाई करतांना दिसून येतात.अशातच प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी महत्वपूर्ण निर्णय देत रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे वाहन जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही.महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार ही कारवाई केवळ तहसीलदारांनाच करता येते,असा महत्त्वपूर्ण निर्णय कामठीतील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी आर.आर. शेरेकर यांनी दिला.तसेच,पोलिसांच्या जप्तीमधील वाहन अर्जदाराला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले.
पवन यादव यांच्या टिप्परमधून रेतीची अवैधपणे वाहतूक करण्यात येत होती,असे कन्हान पोलिसांचे म्हणणे आहे.कन्हान पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून संबंधित टिप्पर जप्त केला होता.त्यामुळे यादव यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यादवतर्फे ॲड.राजू कडू यांनी बाजू मांडतांना पोलिसांना टिप्पर जप्त करण्याचा अधिकार नाही; असा दावा केला.तसेच,यादवच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह टिप्परद्वारे होणाऱ्या कमाईवर अवलंबून आहे.पोलिसांनी टिप्पर अवैधपणे जप्त केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.पोलिस ठाण्याच्या परिसरात टिप्पर खराब होत आहे.करिता, यादवला टिप्परचा ताबा देण्यात यावा; असेही सांगितले.न्यायालयाला या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आले.त्यामुळे पोलिसांच्या जप्तीमधील वाहन अर्जदाराला हस्तांतरित करण्याचे निर्देश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी आर.आर.शेरेकर यांनी दिले.
- Advertisement -