Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीरेगडी येथे बँक सेवा सुरू करा-शिंदे सेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा

रेगडी येथे बँक सेवा सुरू करा-शिंदे सेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सध्याच्या घडीला गोर-गरीबांपासून ते सर्वांकडे बँकेचे खाते आहेत.अनेकजण मोठ्या प्रमाणावर बकेचे व्यवहार करीत असतात.अश्यातच बँकेचे व्यवहार करतांना बँकेच्या सोयी-सुविधा जवळपास असणे गरजेचे असते.मात्र,गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील प्रमुख व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रेगडी व परिसरातील नागरिकांना बँकांच्या आर्थिक व्यवहारांसाठी कोसोदुर जाव लागत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तसेच गैरसोय होऊ नये,याकरीता परिसरातील मुख्य स्थान असलेल्या रेगडी येथे त्वरित बँक शाखा सुरू करण्याची मागणी शिंदे सेनेचे गडचिरोली जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी केली आहे.याबाबत काही दिवसांपूर्वीच को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक पोरेड्डीवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून याबाबत गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे  त्यांनी सांगितले.
चामोर्शी तालुक्यातील रेगडी हे गाव मुख्य केंद्रस्थान असलेले गाव असून गावाला लागून गरंजी,कर्मे, कोंदावाही,वेंगनूर,विकासपल्ली,माडेआमगाव,मकेपल्ली, पोतेपल्ली,पुसगुडा,बोलेपल्ली,देवदा, मोरखंडी अशा अनेक गावांचा समावेश होतो.या सर्व गावांचा दैनंदिन आर्थिक व्यवहार रेगडीमार्फत होत असला तरीही येथे अद्याप बँक शाखेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.विशेष म्हणजे,रेगडी येथे शासकीय आश्रमशाळा,पोलिस स्टेशन,जिल्हापरिषद शाळा, महाविद्यालय,आरोग्य केंद्र अशा महत्त्वाच्या शासकीय संस्था असूनही या ठिकाणी बँक सेवा उपलब्ध नसणे हा गंभीर मुद्दा असल्याचे शाहा यांनी सांगितले.
“रेगडी येथे तात्काळ बँक शाखा सुरू करण्यात यावी; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा ठाम इशारा प्रशांत शाहा यांनी प्रशासनाला दिला आहे.स्थानिक नागरिकांमध्येही या मागणीबाबत तीव्र नाराजी असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!