उद्रेक न्युज वृत्त :-महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत शासकीय रुग्णालयांध्ये वेगवेगळ्या आजारांवर पूर्वी दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जाते.याचा लाभ राज्यातील अनेक गोरगरीब जनता व नागरिकांनी घेतला.महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक,अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार राज्याच्या सर्व नागरिकांना ५ लाख रुपये आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील दीड लाखाच्या विम्याची रक्कम वाढवून ५ लाख रुपये केल्याची घोषणा २८ जून रोजी केली होती.मात्र त्याबाबत कोणताही अध्यादेश अथवा शासन निर्णय जाहीर केला नसल्याने,रुग्णालयात रुग्णांवर जुन्याच विमा योजनेत उपचार केले जात होते.त्यानुसार अनेकांनी पत्रव्यवहार करून शासनास सदर बाब निदर्शनास आणून दिली.शासन निर्णय जारी करण्यासाठी रुग्णमित्र राजेंद्र ढगे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.शासनाने महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण ५ लाखापर्यंत करण्याची घोषणा केली होता.मात्र याबाबत कोणताही शासकीय अध्यादेश रुग्णालयांना देण्यात आला नव्हता.अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते.त्यानुसार मुख्यमंत्री यांनी दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाला सूचना दिल्या.शुक्रवारी शासन निर्णय जारी करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.त्यानुसार सर्व नागरिकांना ५ लाख रुपयांचा आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.
राज्याच्या सर्व नागरिकांना आता ५ लाख रुपये आरोग्य विमा लागू……- महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना….
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES