Sunday, April 26, 2026
Homeगडचिरोलीरस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला धडक; एका महिलेचा मृत्यू तर अनेकजण...

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला धडक; एका महिलेचा मृत्यू तर अनेकजण गंभीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुनिश्र्वर बोरकर
गडचिरोली :-काहीकाळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला भरधाव वेगात येणाऱ्या  ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने अपघातात एका महिला मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दोन महिला मजूर गंभीर जखमी असून अन्य महिलांना गंभीर दुखापत झाल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री गडचिरोली-तेलंगणा सीमेजवळ घडली.यात चंद्रपूर जिल्ह्यातील मिनाबाई अनिल लाटेलवार वय ५० वर्षे,
रा.चांदली(बुज),ता.सावली या महिलेचा जागीच मृत्यु झाला,तर निलाताई मंडरे रा.दिघोरी व विमलताई सोयाम रा.बेंबाळ या दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्याचबरोबर,३७ वर्षीय विकास टेकाम सह अन्य महिला मजुरांना गंभीर दुखापत झाल्याने या सर्वांना रात्रीच्या सुमारास तेलंगणा येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
माहितीनुसार,चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील जवळपास १५ ते २० महिला मजूर
तेलंगणा राज्यात रोवणीच्या कामाकरीता पिकअप वाहनाने निघाल्या होत्या.तेलंगणा सीमेजवळ जातच काहीजणांनी लघु शंकेसाठी पिकअप थांबवले.तितक्याच भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने पिकअप वाहनाला मागून जोरदार धडकी दिली.धडक इतकी भीषण होती की अचानक घडलेल्या घटनेने सर्वजण गोंधळले.यात एक महिला मजूर जागीच ठार झाल्याने उपस्थित महिलांनी एकच आक्रोश केला.लागलीच मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमींना तात्काळ तेलंगणा येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. घटनेने मजूर महिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील संपूर्ण नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणू,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते.त्यानुसार पावले उचलण्यात आली.जे जंगल...

आंधळीत जागतिक हिवताप दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून आज,शनिवार २५ एप्रिल रोजी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी व...

उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे द्या तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल पूर्ण करा- आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे देण्याचे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी...

सावधान..! देसाईगंज तालुक्यात ठगबाजांची टोळी सक्रीय.. घरकुलच्या नावाने जाळ्यात अडकवून पैसे लुटीचा प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महागाईचे संकट असो वा स्वस्ताईतील पुरण पोळी,प्रत्येकांनाच वाटतेय की आपले छोटेसे घर असावे.मग,शासनाच्या अनुदानातून असो की स्वतःच्या खिशातील पैस्यातून बांधकाम केलेले असो....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!