उद्रेक न्युज वृत्त
ब्रह्मपुरी :- महाराष्ट्रात समाज कार्यात मागील १५ वर्षापासुन कार्यरत असणारी सामाजिक संगठना म्हणजे टाईगर ग्रुप आहे. अत्यंत दुर्लभ परस्थितीतुन टाइगर ग्रुपची सुरुवात झाली.समाजातील समस्या अनेक असुन त्यांचे निराकरण करणे कठीण आहे. परंतु त्या समस्यांना पै.तानाजी जाधव यांनी तोंड देत सामाजिक कामाला टाईगर ग्रुपच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातून सुरु केले.अनेक गोर-गरीब जनतेला त्यांनी न्याय मिळवुन दिला.संघटनेमध्ये अनेक युवा वर्ग जुड़लेला असून सामाजिक समस्याचे निराकरण करने हे उद्देश्य धरुन कार्य करीत आहेत.
अशातच ब्रम्हपुरी तालुक्यातुन सुरु झालेली एक सामाजिक संगटना म्हणजे ‘रक्तविर सेना’. ज्या संघठनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत रक्तासाठी मदत केली जाते.ब्रम्हपुरी तालुक्यातीलच रूग्ण नाही; तर गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर,गोंदिया जिल्ह्यातील सुध्दा अनेक रुग्णांना मोफत रक्त मदत करण्यास रक्तविर सेना तत्पर आहे.दोन्ही संगठना सामाजिक समस्या अनुसरुन काम करीत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत टाईगर ग्रुप हे महाराष्ट्र भर पसरले आहे.यात रक्तविर सेना गेल्या एक वर्षापासून सतत आपल्या कार्यातुन चर्चेत रंगत असुन ह्या संघटनेचे सुद्धा बऱ्याच मोठ्या क्षेत्रात कमी वेळेत गतीने जाळे पसरविले असुन रक्तविर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे व उपाध्यक्ष मायासिंग बावरी गडचिरोली येथे संघटनेच्या कार्याची दखल घेण्यासाठी गेले असता;गडचिरोली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमा प्रसंगी टाईगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांची रक्तविर सेना अध्यक्ष निहाल ढोरे व उपाध्यक्ष मायासिंग बावरी यांनी आकस्मित भेट घेऊन विविध विषयांवर व सामाजिक समस्यांवर चर्चा केली.