- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या सोमवार ७ एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून सदरची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी ३ वाजेच्या सुमारास होणार आहे.तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.त्यानंतर तक्रारदारांची सभा सुरू होईल.तालुका पातळीवरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास अशा तक्रारदारांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावेत.या अर्जात तालुका स्तरावरील अहवालाची प्रत व टोकन क्रमांक जोडणे आवश्यक आहे.तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र १ अ ते १ ड) दोन प्रतींमध्ये सादर करावे लागणार आहे.तक्रार वा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.सामूहिक स्वरूपाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिनाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- Advertisement -

