Saturday, October 24, 2026
Homeदेसाईगंजयेत्या २३ फेब्रुवारी रोजी चिंचोली (बु ) येथे उर्स् आणि दुय्यम कव्वालिच्या...

येत्या २३ फेब्रुवारी रोजी चिंचोली (बु ) येथे उर्स् आणि दुय्यम कव्वालिच्या कार्यक्रमाचे आयोजन ….-हजरत सय्यद मोहम्मद इक्बाल शाह बाबा यांच्या उर्स् निमित्याने देसाईगंज येथून निघणार भव्य संदल मिरवणूक…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज (गडचिरोली):- अल्हाज हजरत सय्यद मोहम्मद इक्बाल शाह बाबा यांचा १९ वा उर्स दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे येत्या २३ फेब्रुवारी २०२४  रोज शुक्रवार ला चिंचोली बुजुर्ग तालुका ब्रम्हपुरी या ठिकाणी रात्रौ ठीक 8 वाजता  अम्मा साहेब आणि शफी बाबा यांच्या प्रमुख  मार्गदर्शनाखाली वार्षिक उर्स आणि मान्यवरांचे सत्कार आणि शानदार दुय्यम कव्वाली चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.२३ तारखेला देसाईगंज येथून भव्य संदल मिरवणूक निघणार आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार,खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडीया,आमदार कृष्णा गजबे, आमदार किशोर जोरगेवार,आमदार मनोहर चंद्रिकापूरे,वरोरा येथील माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,तुषार सोम भाजपा,ओबीसी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सतीश वारजुरकर,माजी आमदार अतुल देशकर,किशन नागदेवे माजी जिल्हाध्यक्ष गडचिरोली भाजपा,विनोद संकत ,शंकरलाल अग्रवाल चंद्रपूर ,उद्योगपती भाश्कर डांगे ,राकेश जयस्वाल, राष्ट्रवादीचे नेते नाना नाकाडे,डॉ.नामदेव कीरसान,महेंद्र ब्राम्हणवाडे,तहसिलदार ब्रम्हपुरी उषा चौधरी ,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे,पोलीस निरीक्षक अनिल जित्टावार ,स्मिता पारधी ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच सदर कार्यक्रमात विशेषतः प्रकाश सावकार पोरेड्डीवार

अध्यक्ष गडचिरोली ग्रामीण बॅंक तथा अध्यक्ष हितकारनि शिक्षण संस्था आरमोरी आणि मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तसेच घनश्याम जीवन कावळे नागपूर,प्रल्हाद धोटे वडसा,नामदेव कुथे चिंचोली,यांचा चिंचोली दरबार तर्फे दरबारी सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात दर वर्षी प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात  कुनिका लालाजि पारधी ब्रम्हपुरी ,यामिनि किशोर मेश्राम आरमोरी,आलाप तुषार सोम,रोशन देविदास दिवटे चिंचोली यांचा समावेश आहे.उर्स निमित्य चिंचोली बुजुर्ग या ठिकाणी रात्रौ ठीक १० वाजता अस्लम-मुकर्रम साबरी आणि राजा सर्फराज साबरी यांचा भव्य दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!