उद्रेक न्युज वृत्त :-हवामान खात्याने वर्तवीलेल्या अंदाजानुसार,राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.जळगावमधील चोपडा शहर व तालुक्यात सकाळी ७ वाजेपासून अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पावसामुळे काढणीला आलेली रब्बी पिके धोक्यात आली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
याशिवाय काल बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.नंदूरबारमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.