Friday, May 29, 2026
Homeगोंदियामोठ्या भावाच्या रिसेप्शनच्या दिवशीच लहान भावाने संपवली जीवनयात्रा..

मोठ्या भावाच्या रिसेप्शनच्या दिवशीच लहान भावाने संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-मोठा भाऊ आणि लहान भाऊ मिळून शेती करायचे.वय होत चालल्याने वडिलांनी दोघांसाठीही मुलींचा शोध घेतला होता.मोठ्या मुलाला मुलगी मिळाल्याने मोठ्या मुलाचे लग्न गुरुवार १९ मार्च रोजी केले.त्यानंतर,सोमवार २३ मार्च रोजी स्वागत समारोहचा कार्यक्रम ठरला असतांनाच लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून लहान भावाने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात उघडकीस आली आहे.हेमंत प्रकाश मडावी वय २४ वर्षे,रा.धमदीटोला/पळसगाव,ता.देवरी, जि.गोंदिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या भावाचे लग्न झाले,मात्र आपले लग्न जुळत नसल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.तो सतत अस्वस्थ असायचा आणि किरकोळ कारणावरून चिडचिड करायचा.यातच त्याने टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली.मृतकाचे वडील प्रकाश मडावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय नाही. मानसिक ताण जाणवत असल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा किंवा समुपदेशकाची मदत घ्या,असे चिचगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!